नंदूरबारमध्ये चिंता वाढली; तीन नवे रुग्ण सापडले

0

नंदूरबार: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नंदूरबार जिल्ह्यात करोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नंदुरबारमधील करोना रुग्णांची संख्या ७वर पोहोचली आहे.

काल मंगळवारी सायंकाळी उशिरा या तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात शहादामधील ३१ वर्षीय तरुणाचा, ४५ वर्षीय महिलेचा आणि अक्कलकुवा येथील ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांचा तपशील गोळा केला जात असून त्यांच्याही तपासण्या करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नंदूरबार जिल्ह्यात करोना आजाराचा एक रुग्ण गेल्या आठवड्यात आढळून आला होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा व पोलिस प्रशासनाने सतर्क होत जिल्ह्यात संचारबंदी कडक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.