धर्माधिकारी प्रतीष्ठाणतर्फे दोन प्रवेशद्वाराचे जामनेरात निर्माण

0

जामनेर:

शहरातील प्रकाशनगर जळगाव रोड आणी भुसावळ रोड वरील सरदार पटेल नगर येथे महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्यावतीने भव्य प्रवेशद्वारांचे निर्माण करण्यात आले आहे.गेल्या सहा महीण्यांपासुन लोकवर्गणीतुन या दोन्ही ठिकाणी संस्थेतर्फे एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आला होता.त्याला आता मुर्तरूप प्राप्त झाले असुन त्या भव्य प्रवेशद्वारांचा उदघाटन लोकार्पण सोहळा लवकरच आयोजीत करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण  च्या शेकडो स्वयंसेवकांनी निश्वार्थ भावनेने परीश्रम घेतले आहेत.मंत्री महाजनांच्या हस्ते लोकार्पण येत्या 24 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रवेशद्वारांचे लोकार्पण होणार असल्याचेही प्रतीष्ठाणच्यावतीने जाहीर करण्यात आले.लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर,लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन,जिल्हापरीष सभापती रजनी चव्हाण,पंचायतसमिती सभापती रूपाली पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहाणार असल्याची माहीतीही धर्माधिकारी प्रातिष्ठाणच्या जामनेर शाखेद्वारा देण्यातआली.  जामनेर:महाराष्ट्रभुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रातिष्ठाणच्या वतीने प्रकाश नगर येथील प्रवेश द्वारावर शेवटचा हात फिरवितांना स्वयंसेवक

Leave A Reply

Your email address will not be published.