पारोळा धरणगाव रस्त्यावर अपघात एक गंभीर,दोन जखमी.

0
 पारोळा-
तालुक्यातील दगडी सबगव्हाण फाट्यानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक गंभीर तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली.
याबाबत पारोळ्याकडून दुचाकीवर एम एच १९-सी.एच.-५५७९ वर तलाठी प्रशांत भिकनराव निकम रा पारोळा हे नियुक्तीच्या ठिकाणी रेल लाडली ता धरणगाव येथे बोन्ड अळीच्या याद्या करण्यासाठी जात असताना समोरून येणारे  सुनील उखा मालचे रा विरवाडे ता चोपडा ह मु म्हसवे हा अजय बापू सूर्यवंशी रा म्हसवे या सोबत गाडीचा हप्ता भरण्यासाठी चोपडा येथे जात असताना पारोळा धरणगाव रस्त्यावरील दगडी सबगव्हाण फाट्याजवळील नाग मंदिरासमोर दोघांची जबर धडक होऊन त्यात सुनील हा गंभीर तर अजय व प्रशांत हे जखमी झाले आहेत त्यांना १०८ रुग्णवाहिकेतुन पारोळा कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करून सुनील मालचे यास पूढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.