धरणगाव येथे ऐतिहासिक दिनी गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

0

धरणगांव | प्रतिनिधी 

आज स्थानिय महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे आज या ऐतिहासिक दिनी गरीब , गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.व्ही.टी. माळी यांनी प्रास्ताविक केले.  याप्रसंगी कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक सौ. पी.आर. सोनवणे मॅम  होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ३ जुलै , १८५१ रोजी राष्ट्रपिता , क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले या दाम्पत्यांनी बहुजनांसाठी पहीली शाळा सुरू केली. व शैक्षणिक क्रांतीला सुरूवात केली . या ऐतिहासीक दिवसाचे औचित्य साधुन शाळेतील शिक्षिका श्रीमती एम.जे. महाजन मॅम यांचे वडील मा.जगन्नाथ गंगाराम महाजन ( धरणगांव ) यांच्याकडुन गरीब , गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप शिक्षक बंधु – भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.व्ही.टी. माळी सर तर आभार श्री.एस.व्ही.आढावे सर  यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.