धरणगाव युवक कॉंग्रेसकडून राज्यपाल हटविन्यासाठी तहसीलदारांना निवेदन

0

धरणगाव (प्रतिनीधी) : कोरोना विषाणु च्या संक्रमणाने आपला देश मोठ्या प्रमाणावर संक्रमीत झाला आहे.यावेळेस लोकांचे जीव वाचवणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कसोशिने प्रयत्न सुरू आहेत.

याकालखंडात अंतिम वर्षाच्या विद्यार्थिचिं परीक्षा घेणे आताचा परिस्थितीत भयानक आहे. विद्यार्थिच्या आरोग्य काळजी पोटी,विद्यार्थिचा आरोग्य बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाचा शैक्षणिक परीक्षा न घेण्याच्या महत्व पूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, याचवेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक विद्यापीठ कायद्यावर बोट दाखवत विद्यार्थ्यांचा हिताच्या निर्णयाला राज्यपाल यांनी त्यांच्या अधिकार सांगून विरोध केला. त्यांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यानमधे रोष निर्माण होत आहे.या आधीही महाराष्ट्र हिताच्या निर्णय घेण्यात राज्यपाल दुटप्पीपणा करीत असल्याचे दिसत आहे. यावरून महाराष्टातील विद्यार्थ्यांच्यात आक्रोश उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.

विद्यार्थ्यांचा हिताच्या निर्णयाला विरोध करणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना त्वरित पदावरून हतवुन नविन राज्यपालांचिं नेमणूक करावी अशी मागणी धरणगाव युवक कॉंग्रेस कडून करण्यात आली. यावेळेस धरणगाव तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोlळे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गौरव चव्हाण, निलेश येवले, राजेंद्र ठाकुर, कुलदीप चंदेल हे युवकचे पदाधीकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.