लासुर गावात थर्मल स्कॅनिंग यंत्राद्वारे ग्रामस्थांची आरोग्य चाचणी

0

लासुर, ता.चोपडा(वार्ताहर) : चोपडा तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या प्रदूर्भावाचा पार्श्वभूमीवर गावातील सर्व नागरिकांची आरोग्य विभागातील. कर्मचारी,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका यांचा मदतीने थर्मल स्कॅनिंग व प्लस ऑक्सिमिटर यंत्रणेद्वारे आरोग्याची चाचणी करण्यास सुरुवात झाली. कोरोना रोगाचा संसर्ग आता ५ किलोमीटर अंतरावर येऊन पोहचला असून हातेड येथेही कोरोना रुग्ण आढळले असून उपाययोजना म्हणून सदर सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे.

आरोग्यविभागातील कर्मचारी,आशावर्कर,अंगणवाडी सेविका ह्या गावातील प्रत्येक नागरिकांची घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य चाचणी करून यात गावकऱ्यांना काही लक्षणे आहेत का याची विचारपूस करून नोंद करत आहे.

याप्रसंगी आरोग्य सेवक एन पी चव्हाण, आरोग्य सेविका एस ए खर्चाणे, आरोग्य सेविका के एम वडिले, नगुबाई चांभार, वनिता मोरे, सुनंदा पाटील, जनाबाई पाटील, अंजना महाजन, विजया महाजन, प्रतिभा माळी, भारती महाजन यांसह 10 आशा स्वयंसेविका संपूर्ण गावात घरोघरी तपासणी करून सर्वेक्षण करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.