धक्कादायक : देशात करोनाने केला नकोसा विक्रम, २४ तासांत वाढले एवढे ‘रुग्ण’

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यांचे नवीन रेकॉर्ड होत आहेत.देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 29 हजार 429 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  देशात कोरोना बाधिताची संख्या ९ लाख ३६ हजार १८११ इतकी आहे.

देशात सध्या कोरोनाचे सध्या 3 लाख 19 हजार 840 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 92 हजार 31 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला. त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनामुळे 24 तासांत 582 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची आकडेवारी 24 हजार 309 वर पोहोचली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारी वाढ होण्याचं प्रमाण 63 टक्के तर कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण 96 टक्के असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत देशातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी केवळ 3.95 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देऊन डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्यानं काहीसा दिलासाही आहे.

दरम्यान, 20 हजार 968 रूग्ण बरे झाले हेदेखील एक दिलासा देणारी बाब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.