बुलडाणा जिल्ह्यात लाखोंचा गुटखा व तांदूळ पकडला

0

खामगांव (गणेश भेरडे) : जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेशाने तर खामगाव येथील अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मलकापूर येथे अवैध रित्या साठवलेला 466 कट्टे तांदूळ तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा, ब चार वाहने यांचा अंदाजे 33 लाखांचा माल जप्त केला. साठा आतिकुर रहेमान शफीकुर रहेमान रा. पारपेट मलकापूर यांचा अडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ही कार्यवाही पथकातील psi. चंद्रकांत बोरसे, पोहेकॉ. सुनील देव, पोना. कृष्णा नारखेडे, सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे, पोकॉ. रवींद्र कन्नर, मपोना. मोनाली कुळकर्णी, मापोका. निर्गुना सोनटक्के यांनी केली.

लोकडाऊन असताना एव्हडामोठ साठा आला कसा असा प्रश्न चर्चिला जात असून पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.