धक्कादायक : देशात एका दिवसात 88 नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने आपले चांगलेच हातपाय पसरले आहेत. कारण २४ तासात संपूर्ण देशात ८८ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या ६९४ वर गेली आहे. तर कोरोनामुळे भारतात १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये तीन मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. तर कर्नाटकात दोघांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचाल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १३० वर पोहचली आहे. गुरुवारी पाच रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातलीही कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लोकांना सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरे सरकारने वारंवार केलं आहे. सुरुवातीला काहीशी संभ्रमाची स्थिती होती. मात्र आता लोक सोशल डिस्टंस, गरज असेल तरच बाहेर पडणं या गोष्टी पाळू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.