धक्कादायक : ‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या २० वर्षीय तरुणाला ट्रेनमधून ढकललं

0

कोलकाता :- ‘जय श्रीराम’म्हटलं नाही म्हणून २० वर्षीय तरुण मदरसा शिक्षकाला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना कोलकाता येथील पार्क सर्कल स्टेशन परिसरात घडली आहे. पिडीत हाफीज मोहम्मद शाहरुख हलदर असं या युवकाचं नाव आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मदरसा शिक्षक हाफीज मोहम्मद शाहरूक हलदर काही कामानिमित्त कोलकाताला आला होता. कैनिंग-सियालदाह रेल्वेमार्गावरील लोकलने तो प्रवास करत होता. तो चढल्यापासूनच ट्रेनमधील जमाव त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. ट्रेन हुगळी परिसरातून जात असताना जमावाने त्याला ‘जय श्री राम’ म्हणण्याची सूचना केली. २० वर्षीय हलदरने जय श्री राम म्हणण्यास ठामपणे नकार दिला. यामुळे ट्रेनमधील जमावाने त्याला जब्बर मारहाण केली. पार्क सर्कल स्टेशनजवळ येताच चालत्या ट्रेनमधून त्याला बाहेर ढकलण्यात आलं. हलदर प्लॅटफॉर्मवर आपटला आणि गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.