धक्कादायक.. चुलत भावासोबत मिळून मुलीनेच केला बापाचा खून

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापूर येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.  शहरातील सुभाषचंद्र बोस नगर येथे  राहणाऱ्या रावणचवरे कुटूंबात झालेल्या वादातून  मुलीने चुलत भावासोबत मिळून बापाच्या पोटात चाकू खुपसून खुन केल्याची हृद्यद्रावक घटना काल रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परीसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान झालेल्या घटनेमागे अनैतिक संबंधांचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत परीसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील गुलाब यादव रावणचवरे आपल्या कुटूंबीयांसोबत रहिवासाला आहे. त्याच्या सोबत घरात त्याची एक विवाहीत मुलगी देखील एका वर्षापासुन कौटुंबिक वादामुळे माहेरीच राहत आहे. याबरोबर गुलाब यांचा पुतण्या प्रकाश रावणचवरे हा देखील त्यांच्याकडेच वास्तव्यास होता. काल रात्री मुलगी  लक्ष्मी हरीषचंद्र सरीशे (वय १८)  व पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे (वय २३)  या दोघांसोबत गुलाब रावणचवरे याचे काही कारणावरून वादंग सुरू झाला. शाब्दीक चकमक  हमरीतुमरीवर येत हामाणारी पर्यंत पोहचली.

या भांडणात  लक्ष्मी व प्रकाश या दोघांनी मिळून गुलाब रावणचवरे यास बेदम मारहाण केली. त्याच वेळेस प्रकाश याने गुलाब रावणचवरे यांच्या पोटात  छातीमध्ये चाकुने सपासप वार केले. या घटनेत गुलाब हे गंभीर जखमी होवून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. झालेली घटना गुलाब रावणचवरे यांच्या तेरा वर्षीय मुलगी वैष्णवी हीने पाहीली होती. तिने तात्काळ घटनेची माहिती जवळील पोलीस ठाण्यात जावून कथन केली. घटनेची माहिती कळताच संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेसंदर्भात वैष्णवी हिने दिलेल्या फियादीवरून मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पो.नि. प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय  बोराडे हे तपास करीत आहेत.

दरम्यान, लक्ष्मी शिरसे ही विवाहित असून ती गेल्या एक वर्षापासुन आई वडीलांकडेच राहत होती. प्रकाश रावणचवरे हा गुलाब यांच्या चुलत भावाचा मुलगा असुन तो देखिल त्यांच्याकडे वास्तव्यास होता. शिवाय प्रकाशची आई ही गुलाब यांच्या पत्नीची सख्खी बहिण देखिल आहे. प्रकाश व लक्ष्मी हे तरूण असल्याने दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याची चर्चा परीसरात सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. याच अनैतिक संबधांचा उलगडा गुलाब रावणचवरे यांना झाला असावा असा अदांज वर्तविला जात आहे. यातून ही हत्या घडली असावी या दिशेने पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस सुत्रांतून सांगण्यात आले. दरम्यान लक्ष्मी व प्रकाश या दोघांनाही पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील कामकाज उशिरापर्यंत सुरू होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.