धक्कादायक ! एकाच खड्ड्यात तब्बल 8 कोरोनाबाधितांचे मृतदेह दफन केल्याचा व्हिडिओ व्हायरल

0

बंगळुरू : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात कोरोनामूळे जवळपास १७ हजार लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान,कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांनी एकाच खड्ड्यात तब्बल 8 कोरोनाबाधितांचे मृतदेह दफन केल्याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं.

व्हिडीओमध्ये, PPE किट घातलेले कर्मचारी जवळच उभ्या असलेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. त्यानंतर ते एका मागोमाग एक आठ मृतदेह एक मोठ्या खड्ड्यात टाकत होते. यूट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणार्‍या व्यक्तीनं असा दावा केला की ही घटना बल्लारी जिल्ह्यातील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, मृतांना अशी वागणूक का दिली जात आहे? असा सवाल विचारला जात आहे. तर, काहींनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

जनता दल पक्षानं आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड केला आहे. यात त्यांनी सावध राहा, जर तुमच्या घरातल्या कोणाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यास भाजप सरकार कर्नाटकमध्ये असे मृतदेह फेकून देत आहे, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.