दोन वर्षांच्या मुलीसह महिला बेपत्ता

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील पाडळसा येथील २४ वर्षीय महिला दोन वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाली असल्याची झाल्याची मीसींग नोंद फैजपूर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

मनिषा उमेश कोळी (वय २४) ही महिला पाडळसा गावातुन दोन वर्षीय मुलीसह मंगळवारी गहु घेऊन येते असे सांगून निघाली आहे. ती अद्यापही घरी परतली नसल्यामुळे फैजपुर पोलिस स्टेशनला रजूबाई कोळी यांच्या खबर वरून मिसींग नोद करण्यात आली आहे.

सदर महिला दिसून आल्यास फैजपुर पोलिस स्टेशनला तसेच उमेश कोळी (8317217063) व राजू कोळी (82639 40228) यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.