श्री गजानन महाराज शेगाव संस्थानकडून दर्शन सुविधेसंबंधी मार्गदर्शक सूचना जारी

0

शेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना महामारीमुळे राज्यातील  धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोनाचाही ओसरती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना विषयक नियम अटींचे पालन करत धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून ७ तारखेला देवस्थानं उघडण्यात येणार आहेत. या पाश्वभूमीवर शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानाकडून दर्शन सुविधेसंबंधी उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना जरी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणेː

श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनाकरीता दि . ०७/१०/२०२१ पासून खुले करण्यात येत आहे . श्री दर्शन सुविधा तुर्तास ई – दर्शन पासद्वारे राहील .

• श्री भक्तांनी दर्शनाकरीता येतांना श्री ई – दर्शन पास व आधारकार्ड सोबत आणावे.

• ज्या भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे स्मार्ट / अॅन्ड्रॉईड फोनवरून ई – दर्शन पास करीता नोंदणी केली असेल त्यांनी श्री ई – दर्शन पास / पासचा आय.डी. क्रमांक सोबत आणावा.

• निःशुल्क ई – दर्शन पासची नोंदणी करीत असतांना तांत्रिक अडचण आल्यास – ९५२९६५८०७४ / ८७६६५७३४८७ या मोबाईल नंबर वर २४ तास संपर्क करता येईल.

• श्री दर्शनार्थी भाविकांनी ई – दर्शन पास काढतांना आधारकार्डवरील पत्ता टाकणे / नोंदविणे गरजेचे आहे.

• प्रत्येक दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र ई – दर्शन पास असणे बंधनकारक राहील.

• कोविड नियमानुसार सेवेत श्री महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहील.

• श्री दर्शनार्थी भाविकांकरीता पर्याय म्हणून पादत्राणे ठेवण्याची नियमानुकूल स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

• प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी ९ , ००० भाविकांना ई – दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल.

• श्री मंदिरात प्रवेश करतांना मास्क वापरणे , थर्मल स्क्रिनिंग वसनिटायझर करणे बंधनकारक राहील.

• हार , फुले , प्रसाद , नारळ , चिरंजी , पेढे , उदबत्ती , इत्यादी पुजेचे व प्रसादाचे साहित्य सोबत आणू नये.

•  नियमानुसार ६ फुटाचे सामाजिक / सुरक्षित अंतर ठेवावे लागेल.

• शासनाचे निर्देशानुसार १० वर्षाचे आतील व ६५ वर्षाचे वरील तसेच गर्भवती महिलांनी व रेड झोन, कन्टेन्मेंट झोन व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी श्रींचे दर्शनाकरीता येऊ नये.

• प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता प्रसंगानुरूप आवश्यक बदल करण्याचे संपूर्ण अधिकार व्यवस्थापनाचे अधिन असून श्री संस्थेकडे सरंक्षित / सुरक्षित  आहेत.

श्रींचे दर्शनाकरीता नि : शुल्क ई – दर्शन पासची सुविधा श्री संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ ( वेवसाईट ) www.gajananmaharaj.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (नेट, कॅफे, सेतू, स्मार्ट फोनवरून सुद्धाई – दर्शन पासची सुविधा उपलब्ध करून घेता येईल)

 टिप- 

• श्री दर्शन सुविधा ही निःशुल्क आहे, कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी.

• भक्तनिवास संकूल व विसावा भक्तनिवास संकुल आणि आनंदविहार भक्तनिवास संकूल येथे भाविकांकरीता कोविड नियमानुसार निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था उपलब्ध राहील.

•परिस्थितीजन्य स्थिती लक्षात घेता सेवकांकडून काही न्युनता भासल्यास क्षमा करावी

Leave A Reply

Your email address will not be published.