देश सेवेत रुजू झालेल्या जवानांचे साकेगावात जल्लोषात स्वागत

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकेगाव येथील स्वप्नील पाटील व दीपक कोळी हे नुकतेच भारतीय सैन्यदलात रुजू झाले. त्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर पहिल्यांदाच  त्यांचे गावात आगमन झाले. यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील जवानांचे जल्लोषात स्वागत केले. तर तरुणांनी जवानांचे स्वागत मोटर सायकल रॅली तसेच ढोल ताशे व फटाक्यांच्या गजरात  स्वागत केले

यावेळी त्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पाटील भाजपा तालुका उपाध्यक्ष सुभाष कोळी सरपंच अनिल पाटील माजी सरपंच आनंद ठाकरे सुरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य माणिक  कोळी गजानन कोळी माजी पोलीस पाटील किसन पाटील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र त्रंबक पाटील यांचेसह सहा गावातील शेकडो तरुणांची उपस्थिती होती. तसेच देश सेवेत रुजू झालेल्या दीपक कोळी व स्वप्नील पाटील यांची सेवा उत्तरोत्तर उंचावणारी व देश सेवा देणारी होत राहो हीच प्रभु चरणी प्रार्थना व शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave A Reply

Your email address will not be published.