‘त्या’ मद्यपी पित्याचे जिल्हा रुग्णालयातून पलायन

0

जळगाव- आर्कीड हॉस्पिटलसमोर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या मद्यपी तरुणाने शुद्धीवर येताच बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातून आपल्या मुलीसह पळ काढल्याचे रुग्णालयातील सुत्रांनी सांगितले.

दारु पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पित्याजवळ असहाय्य बालिका आढळल्याचे वृत्त दै. लोकशाहीने प्रथम पानावर मद्यधुंद पित्याजवळ असहाय्य बालिका आशयाचे वृत्त मंगळवारी प्रकाशित केले होते. रुग्णालयात मंगळवारी रात्री तपास केला असता तो बेशुद्धावस्थेतच होता. तर त्याच्यासोबत असलेली बालिका आपल्या पित्याला चिकटून झोपलेली होती. दरम्यान बुधवारी तपास केला असता त्याने आपल्या मुलीसह पलायन केल्याचे समजले. त्याच्या निघून जाण्याने सर्व प्रश्न अनुत्तरीत जरी राहिले असले तरी ती बालिका आपल्या पित्याजवळ सुखरुप आहे एवढेच समाधान असल्याचा सूर उमटला.

Leave A Reply

Your email address will not be published.