अशोक डहाळे यांच्या निधनाने वुत्तपत्र विक्रेत्यांची संघटना पोरकी

0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जेष्ठ वुत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापकांपैकी एक असलेले अशोक डहाळे यांचे वुद्धपकालने निधन झाले . त्यांच्या निधनाने वृत्तपत्र संघटना पोरकी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्क आणि न्यायासाठी अशोक डहाळे संघर्ष करीत होते . वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अनेकदा त्यांनी संघर्षची भूमिका घेतली. असे संघर्षमय लढा लढत असतांना हि वसंत वाचनालय कठीण परिस्तिथीत सुरु ठेवले . अशोक  डोहाळे (६८) हे नवी पेठेतील रहिवाशी असून त्यांच्या जाण्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विक्रेत्यांचे  प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केल्याची भावना राज्य वृत्तपत्र संघटनेचे खान्देश सचिव गोपाल चौधरी , शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे विलास वाणी , रवींद्र जोशी , नितीन चौधरी , हेमंत खडके , तुषार चौधरी , विजय कोतकर , प्रदीप वाणी यांनी व्यक्त केल्या आहे .   

Leave A Reply

Your email address will not be published.