दुचाकी चोरून नेणाऱ्या आरोपीला पब्लिक मार

0

एरंडोल (प्रतिनिधी) :-एरंडोल येथे बालाजी मढी परिसरात घरासमोरून उभी केलेली MH19 N 1127 क्रमांकाची दुचाकी चोरून नेत असताना नगरसेवक कुणाल महाजन व विशाल महाजन यांनी बादशाह रामदास पावरा वय वर्ष 20 राहणार गिरणा पंपिंग रोड पाचोरा याला रंगेहात पकडले यावेळी जमलेल्या संतप्त जमावाने बादशाह पावरा याला चांगलाच चोप दिला व एरंडोल पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली.

एरंडोल येथे बाबूलाल धुडकु महाजन यांनी यांच्या घरासमोर नेहमीप्रमाणे मोटर सायकल लावलेली होती. बादशाह पावरा हा दुचाकी लोटत नेत होता. त्यावेळी नगरसेवक कुणाल महाजन व त्यांचे मित्र विशाल महाजन हे दुचाकीने जात होते त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी पावरा याला जाब विचारला असता त्याने  उडवा उडवीची उत्तरे दिली व दुचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणाल महाजन यांनी दुचाकी मालक बाबूलाल धुडकु महाजन यांना आवाज देऊन बोलावले त्यांनी दुचाकी चोराचा पाठलाग करून गणपती मंदिराजवळ रंगेहात पकडले तोपर्यंत लोकांची गर्दी झाली होती जमलेल्या जमावाने चोराची धुलाई केली. नंतर त्याला पोलीस स्टेशन ला नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन आरोपी बादशहा पावरा याला अटक करण्यात आली. सात ऑगस्ट रोजी आरोपी बादशाह पावरा याला एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने नऊ ऑगस्ट पर्यंत त्याला पोलिस कोठडी दिली. याबाबत हेड कॉन्स्टेबल सुनील लोहार, निलेश ब्राह्मणकर, संदीप सातपुते हे तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.