कुस्ती मातीतला अस्सल मर्दानी खेळ युवा नेते मंगेश चव्हाण यांचे प्रतिपादन

0

चाळीसगाव :-चाळीसगाव तालुक्यातील गोरखपुर, पिपरखेड तांडा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कै. चेनन्सिंग वस्ताद (पहलवान) यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली होती .या कुस्तीच्या दंगलीचे आखाडा पूजन करताना युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, कुस्ती हा महाराष्ट्रातील मातीतला मर्दानी खेळ आहे ,या खेळाला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी राजाश्रय दिला तेव्हापासून कुस्ती अधिक जोमाने महाराष्ट्रभर पोहोचली ,याचे फलित म्हणून आपल्या तालुक्यातील सायगाव येथील सुप्रसिद्ध मल्ल व सध्या अक्कलकुवा येथे डी वाय एस पी असलेले  विजय चौधरी यांनी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा मानाचा पुरस्कार मिळवला ,तशी कुस्तीची परंपरा ही आपल्या तालुक्याला आहेच ,या कुस्ती च्या माध्यमातून अधिकारिक मल्ल परिणामी महाराष्ट्र केसरी तयार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .तसेच कुस्तीसाठी आवश्यक असणारी सर्वतोपरीने मदत करण्याची ची इच्छा त्यांनी व्यक्त केली, यावेळी आखाड्याचे पूजन युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करून त्यांच्याच हस्ते सामन्यातील जोड लावून कुस्त्यांची सुरुवात करण्यात आली यावेळी रोहिणी चे सरपंच अनिल नागरे ,जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश राठोड, पिंपरखेड चे सरपंच गोरख राठोड, नेताजी चव्हाण ,मकराम राठोड ,माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी ,यांच्यासह सह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.