देशात गेल्या २४ तासांमध्ये ९०९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण ; आकडा 8,356 वर

0

मुंबई : देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या ८,३५६ वर पोहोचली आहे असून २४२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती. देशात महाराष्ट्र राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १७६१ इतकी झाली आहे.

देशातील ५८६ रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून तेथे एक लाखाहून अधिक विलगीकरण खाटा आणि अतिदक्षता विभागातील ११ हजार ५०० खाटा करोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी सांगण्यात आले.  सरकारने संचारबंदी आणि अन्य निर्बंध लादले नसते तर १५ एप्रिलपर्यंत देशातीलबाधितांची संख्या ८.२ लाखांहून अधिक झाली असती, असे आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.