देशात कोरोनाचा कहर सुरूच ; २४ तासांत ७६८ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर सुरूच असून करोनाचा संसर्ग कमी न होता तो तीव्र गतीने वाढत आहे. मागील २४ तासांत देशात ४८ हजार ५१२ नवे करोनाबाधित आढळले तर ७६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ३१ हजार ६९९ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात करोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ९ हजार ४४७ आहे. तर, ९ लाख ८८ हजार ३० जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे. देशात आतापर्यंत करोनामुळे ३४ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.