देशवासियांनो घरातच सुरक्षीत बसा…!

0
पारोळा–प्रतिनिधी -सुमीत मिलिंद नावरकर भारतातील महाराष्ट्र जळगांव जिल्हातील पारोळा येथील असुन सद्या युरोप कंट्रीतील जाॅर्जिया देशांतील तिबलीसी येथे गेली 3 ते 4 वर्षापासून वैद्यकीय शिक्षण घेत आहे आज संपूर्ण जगात कोरोना सारख्या महामारी या विषांणूने ग्रासले असुन सर्व देशांत यांची लागण होतं आहे त्यात आम्ही शिकत असलेल्या जाॅर्जिया देशातही लागली असुन या ठिकाणी ही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आम्हांला सद्या सुट्या लागलेल्या असतांना आम्ही भारतात येणार होतो पण इंटरनॅशनल उडाने बंद केल्याने आम्ही 200 ते 300 विद्यार्थी इकडे अडकलो असुन आम्ही विद्यार्थी मित्रांनी भारत सरकारकडे आणण्याची विनंती देखील केलेली आहे कारण इकडे देखील आम्हांला घराबाहेर पडण्यास मनाई केलेली आहे आणि ते पाळणे देखील गरजेचे आहे कारण एकमेकांशी संपर्क टाळण्यासाठी आम्ही गेली 15 ते 20 दिवसापासून घरात बसून आहोत यामुळे देखील येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खबरदारी आहे तसेच आम्हांला माॅक्स, सॅनिटाझर, ग्लोज या सारख्या सुरक्षेच्या वस्तू मिळत नव्हत्या मग आम्ही *भारतीय ॲम्बेसी या दूतावास या ठिकाणी मेल केला आम्हांला २४ तासाच्या आत भारतीय ॲम्बेसीचे डेरीस्पाॅन प्राराशर हे घरी देण्यास आले जर इकडे कोणाला अडचण येत असेल तर भारतीय ॲम्बेसी ऑफिसला मेल करा नक्कीच आपणांस मदत मिळेल.* तसेच इकडील माझ्या भारतवांसीय मित्रांना विनंती आहे कि सर्व जगात हे संकट असुन घाबरून न जाता इकडे काही काळासाठी माॅल्स, दुकाणे, बेकरी सुरू असतात तरी आपण सर्वानी एक महिना पुरेल एवढा किराणा भरून संयम पाळुन घराबाहेर निघु नये. देशवासिय इकडच्या देशांची लोकसंख्या 5 ते 6 कोटी असुन प्रगत देश आहेत आपला देश 21 व्या शतकांकडे जात असतांना या कोरोना सारख्या महामारीच्या संकटाला तोंड देत आहे इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशांची लोकसंख्या 135 कोटी आहे. *जर आपल्या देशांत वैद्यकीय सेवा अपुर्ण व पुरेसी पडत नसल्यास आपल्या देशांत जे वैद्यकीय शिक्षण घेत आहे अश्या तिसर्या वर्षा पुढील मुलांना प्रशिक्षण देऊन मदत घ्यावी भविष्यात याचं मुलांना कामात येणारी आहे. ज्याप्रमाणे आम्हांला देखील काॅलेजने बोलवले व हाॅस्पीटल मध्ये जाण्याची विनंती केली आहे* त्यामुळे माझी सर्व देशवासियांना हात जोडून विनंती आहे कि आपल्या देशांचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे व त्यांचे सहकारी वेळोवेळी ज्या सुचना देतील त्यांचे आपण सर्वानी पालन करावे. या महामारीला हद्दपार करण्याठी प्लीज प्लीज हात जोडून विनंती कि घराबाहेर कोणीही निघु नका. आज आम्ही परिवारांपासुन दुर आहोत त्यामुळे सर्वाना काळजी वाटणे साहजिक आहे पण आज आपण सर्वानी सयंम ठेवणे काळजी घेणे म्हत्वाचे आहे. आपण सलामत तर देश सलामत जय हिंद जय महाराष्ट्र

Leave A Reply

Your email address will not be published.