देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

0

 मुंबई – भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची अधिकृत माहिती खुद्द फडणवीस यांनी ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी क्वारंटाईन व्हावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिलाय.

देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून ते महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत होते. ”लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !, असे ट्विट फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांना नेमकी कोठून कोरोनाची लागण झाली, याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना काळजी घेत, कोरोना चाचणी करावी, असे आवाहन खुद्द फडणवीस यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.