दुय्यम निबंधक कार्यालय शहराबाहेर हलवु नये जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

0

 मलकापूर:- शहरातील तहसील कार्यालय आवारात असलेले दुय्यम निबंधक कार्यालय हे शहराबाहेर नदीकाठी हलविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे हे कार्यालय हलविल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागेल या कार्यालयाचे बांधकाम ज्या ठिकाणी करण्यात आलेले आहे ती जागा गावाबाहेर नळगंगा नदी ओलांडून पलीकडे शासनाच्या जमिनीवर असून या नदीवरील पूल अतिशय कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नेहमी पुलावरुन पाणी राहत असल्याने पावसाळ्याचे चार ही महिने तो मार्ग बंद राहतो तसेच नदीपात्रात मधील या जागेच्या आजूबाजूला विटभट्टे लावल्या जातात,  हा रस्ता सुनसान असल्याने खरेदी-विक्रीसाठी लाखो रुपये घेऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांवर पैसे चोरी होण्याची, हल्ला होण्याची भीती नेहमीच राहणार आहे.

खरेदी-विक्री म्हटले की लाखो रुपयांचे व्यवहार दिवसभरात कार्यालयात चालत असतात या भागात होत असलेल्या कार्यालयापासून नागरिकांना चोरापासून, दरोडेखोरांपासून मोठी भीती निर्माण होणार असुन या मुळे नागरिकांना आर्थिक मानसिक शारीरिक असा सर्व प्रकारचा त्रास होणार आहे या कार्यालयाशी महिला वर्गाचा सुद्धा संबंध नेहमीच येत असतो त्यांना सुद्धा ते परवडणारे नाही तसेच खेडे विभागातील ग्रामस्थांना शहराबाहेर कार्यालय गेल्याने त्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागेल तसेच या कार्यालयाशी संबंधित बहुसंख्य लोक शेतकरी व व्यापारी वर्ग असल्यामुळे होणारे कार्यालय त्यांना गैरसोयीचे होणार आहे या कार्यालयास संबंधित असणारे स्टेट बँक उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय तलाठी कार्यालय नगर परिषद कार्यालय आवारात असल्याने होणारे दुय्यम निबंधक कार्यालय सुद्धा शहरात होणे जरुरी आहे जेणेकरून वरील संबंधी कार्यालयाशी संबंधित कामे योग्य प्रकारे होऊ शकतील व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही, या कार्यालयाशी संबंधित शेतकरी ग्रामीण भागातून ये जा  करावी लागते शहरापासून होणारे नियोजित ठिकाणचे कार्यालय10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे खरेदी-विक्री साठी बसेस ची व्यवस्था या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे हे ठिकाण शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाह.

तरी मी साहेबांना विनंती निवेदनाच्या विचार करून दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी हलविण्यात येऊ नये तालुक्यातील नागरीकांच्या सोयीखातर तहसील कार्यालय आवारात भुमी अभिलेख कार्यालय, कोषागार कार्यालय प्रमाणे च प्रशासकीय इमारतीच्या आवारातच खरेदी-विक्री कार्यालय कायमस्वरूपी करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे  निवेदनावर बंटी सुरेश पाटील, नरेंद्र बुरड,श्रावण (मुन्ना) पानसरे, प्रमोद टोंगळे, पुरुषोत्तम रायपुरे, विजय खंगार, संजय अग्रवाल, यशवंत देशमुख, एस.आर. तायडे सह इतर नागरिकांच्या सह्या नमुद आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.