मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0

मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीच्या आजचा महत्वाचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, आज देखील ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुनावणीला सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुरुवात होणार आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण जे मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या पाच सदस्यीय खंडपीठाचं नेतृत्त्व करत आहेत. आम्ही सहा ते सात वकील वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. त्यामुळे आम्हाला संवादामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण किचकट आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात यावी.” तसेच “याप्रकरणात अंतरिम स्थगिती राज्य सरकारच्या विरोधात आहे, मात्र त्याच्या मेरिटमध्ये न पडता आम्ही ही मागणी करत आहोत.” असे रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले होते.

 

राज्य सरकारची बाजू मांडणारे दुसरे वकील कपिल सिब्बल यांनीही न्यायालयात युक्तीवाद करताना आपण मुकूल रोहतगी यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले होते. न्यायालयात प्रलंबित असलेला आरक्षणाचा तिढा संपवण्यासाठी आपण राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि ही स्थगिती उठवण्यासाठी प्रयन्त केला पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी राजकीय पक्ष बाजूला ठेऊन एकत्र येऊन काम केले पाहिजे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा हा लढा पुढे जावा. लढा देत असताना कुणाकडे तरी याचे नेतृत्व दिले पाहिजे असे माझे मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.