दीपस्तंभ यशोत्सव कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन

0

राज्यसेवा परीक्षेतील यशस्वीेतांचा होणार सत्कार

जळगाव । 14 वर्षापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळालेल्या विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव व कौतुक सोहळा म्हणजेच “दीपस्तंभ यशोत्सव” या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते.अत्यंत प्रेरणादायी व भविष्याला दिशा देणा-या या कार्यक्रमाची अखंडता जपत या वर्षीही या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे.
दीपस्तंभ परिवारातील 20 विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.तसेच 53 विद्यार्थी PSI परीक्षा उत्तीर्ण झाले आहे .या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या परिवारासह सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. प्रवीणसिंह परदेशी (अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र) तसेच मा. श्री महेश भागवत (अतिरीक्त पोलीस महासंचालक ,तेलंगणा) , श्री. विशाल मकवाने( सयुंक्त आयकर आयुक्त, जळगाव )हे मार्गदर्शन करणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या परिवाराला ऑनलाईन कार्यक्रमात शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहेत.काही निवडक विद्यार्थी आपल्या यशस्वी प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त करतील. कार्यक्रमाचे प्रक्षेपण दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र च्या फेसबुक पेजवर दिनांक 5 जुलै रविवार रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहेत.दीपस्तंभ परिवारातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ,शिक्षक, लेखक, जेष्ठ सदस्य, दीपस्तंभ चे आजी माजी विद्यार्थी तसेच महाराष्टातील विविध क्षेत्रातील तरुण या कार्यक्रमाला लाईव्ह उपस्थिती देणार आहेत.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच इतर क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे डॉ. हर्षल कुलकर्णी यांनी केले आहे.https://mtouch.facebook.com/Deepestambhspardha/ या फेसबुक लिंक वर जाऊन लाईव्ह कार्यक्रम बघता येईल.अधिक माहितीसाठी 9922004491 / 99220094या नंबर वर संपर्क करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.