कोरोनाचा संसर्ग थांबेना ! जिल्ह्यात आज १६९ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात आज १६९ रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहर ५७, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ ९, अमळनेर १८, चोपडा ४, पाचोरा १, भडगाव ३, धरणगाव ३, यावल ८, एरंडोल १४, जामनेर १४, रावेर ५, पारोळा २, चाळीसगाव २, मुक्ताईनगर १ आणि बोदवड येथे १६ रूग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१७६ वर गेली आहे.

दरम्यान कोरोनामुळे आज ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे. यात जळगाव शहरातील ४, जळगाव तालुक्यातील १, भुसावळ तालुका १, अमळनेर तालुका १, भडगाव तालुका १, पाचोरा तालुका १, जामनेर तालुक्यातील २ रूग्णांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.