दिव्य काशीच्या माध्यमातून विश्वाला भारतीय संस्कृतीची ओळख होणार

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण आज अत्यंत धार्मिक वातावरणात तसेच पवित्रमय साधुसंतांच्या सहवासात पार पडले. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून सोनेश्वर महादेव मंदिर जामनेर येथे काशीविश्वेश्वर धाम लोकार्पण सोहळा साधुसंतांच्या उपस्थितीत व कीर्तनकारांच्या मधुर संगीताने तसेच संतोष कुमावत यांच्या द्वारे सादर करण्यात आलेल्या गाडगेबाबांच्या मंगलमय प्रबोधनाने पार पडला.

यावेळी श्रद्धेय श्री. श्याम चैतन्यजी महाराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीला एक विश्व ओळख देण्याच कार्य हाती घेतलेलं  असून भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक व सर्वव्यापी आहे, त्या अनुषंगाने “दिव्य काशी भव्य काशी” च्या माध्यमातून आज एक अध्यात्मिक तसेच विश्वाला प्रेरणा देणारा सोहळा पार पडत आहे.

यावेळी जामनेर नगरपालिकेच्या प्रथम महिला नगराध्यक्ष साधनाताई गिरीश महाजन, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तुकाराम आप्पा निकम, गजानन महाराज मांडवेकर, हभप देवराम चौधरी, सिंधुबाई शिंदे, विमलबाई चौधरी, मीराबाई महाजन, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, शहराध्यक्ष आतिश झाल्टे, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, दीपक तायडे, माजी नगरसेवक, महेंद्र बाविस्कर, सुहास पाटील, श्रीराम महाजन, रमेश नाईक, बाळू चव्हाण, युवा तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण, कैलास पालवे, रामकिशन नाईक, सुभाष पवार, विजय शिरसाट, विकास वंजारी, संजय सूर्यवंशी, वैभव नाईक, मनोज जंजाळ, गणेश पोळ, देविदास परीट, राजेंद्र वानखेडे (शेंगो) आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.