दिलासादायक ! देशात आजवर ७० लाख रुग्ण झाले बरे ; २४ तासात आढळले ५१ हजारांखाली रूग्ण

0

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसापासून रूग्ण संख्या घटताना दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत ५०,१२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने ७८ लाखांचा टप्पा पार केला आहे.

तर आजवर तब्बल ७० लाख करोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. भारतासाठी ही मोठी समाधानकारक बाब ठरली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

देशात एकूण करोनाबाधितांची संख्या ७८,६४,८११ वर पोहोचली असून यांपैकी ६,६८,१५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ७०,७८,१२३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत ६२,०७७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच १,४०,७०२ वर पोहोचली आहे. भारतात आजवर करोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या १,१८,५३४ इतकी असून ५७८ नव्या रुग्णांचा चोवीस तासांत मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.