सेवानिवृत्त प्राध्यापकाची नकली सोन देऊन ७ लाखात फसवणूक

0

यावल (प्रतिनिधी) : येथील शहरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची भामटयांनी सोन्याचे नकली मनी देवुन सात लाख रुपयांमध्ये फसवणुक केल्याची घटना घडली असुन या फसवणुकीच्या प्रकाराची शहरात सर्वत्र एकच चर्चा होत असुन , यावल पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी अशा भामट्यांपासुन नागरीकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भातील मिळालेले वृत्त असे की यावल शहरातील विस्तारित वसाहतीमधील विरार नगर परिसरात राहणारे सेवा विनृत्त प्रा .एस.डी. पाटील यांच्याकडे काल दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दोन अज्ञात भामटे आले व आम्ही राजस्थान येथील राहणारे असुन आम्हास एका ठिकाणी कामात गोदकार्य करतांना जवळपास एक किलो सोन्याचे दागिने सापडले असुन आम्ही हे सोन्याचे दागिने अत्यंत कमी भावात विकुन टाकणार आहे असे सांगुन पाटील कुटुंबांना विश्वासात घेवुन बाजारात जवळपास ६० लाख रुपये किमतीचे दागीने हे आपणास फक्त सात लाखात मिळत आहे या आमीषाला बळी पडुन त्यांनी या भामट्यांच्या भुलथापांना बळी पडुन हे दागिने खरीदी केल्याची घटना घडली असुन , एका अत्यंत सुक्षाशित कुटुंबाच्या अशा प्रकारे दोन भामट्यांकडुन सोन्याच्या आमीषाला बळी पडून झालेल्या फसवणुकीमुळे वसाहती मधील नागरिकांमध्ये असुरक्षेते वातावरण निर्माण झाले असुन , यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी अशा प्रकारे आमीष दाखवुन फसगत करणाऱ्या भामट्यांकडुन सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.