दिलासादायक! देशभरात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट

0

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होतानाचे दिसून येत आहे. मागील  गेल्या २४ तासांत देशभरात ६२ हजार ४८० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. एका दिवसात १ हजार ५८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या ७३ दिवसांनी ८ लाखांच्या खाली आली आहे.

गेल्या २४ तासात भारतात ६२ हजार ४८० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. तर दिवसभरात देशात ८८ हजार ९७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ वर गेला आहे. देशात २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ४९० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ७ लाख ९८ हजार ६५६ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात गुरुवारी ९,८३० नवे कोरोना रुग्ण, तर २३६ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाख ४४ हजार ७१० झाली असून, मृतांचा आकडा एक लाख १६ हजार २६ झाला आहे. सध्या एक लाख ३९ हजार ९६० रुग्ण उपचाराधीन आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.