मुस्लिम समाजाला १o टक्के आरक्षण देण्याची किनगांव येथील सामाजिक कार्यक्रत्यांची मागणी

0

किनगांव प्रतिनिधी : राज्यातील मुस्लिम समुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकार ने लवकरात लवकर मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण तसेच शिक्षण आणि संरक्षण देण्याची किनगांव येथील सामाजिक कार्यक्रत्यांच्या वतीने तहसिलदार अहमदपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की राज्यात मुस्लिम समाजाला १० टक्के तात्काळ आरक्षण देण्यात यावे,सच्चार समीती, रंगनाथ मिश्रा समीती आणि महेमुदूर रहेमान समितीच्या अहवालाप्रमाणे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि रोजगारामध्य तात्काळ १० टक्के आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मोफत प्रशिक्षण संशोधन संस्था जसे की बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर प्रशिक्षण संस्था संशोधन केंद्र सुरू करण्यात यावे, मुस्लिम समाजावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी अट्रोसिटी सारखा “अल्पसंख्याक अन्याय अत्याचार प्रतिबंधक संरक्षण कायदा” तयार करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, दिवसेंदिवस मोहसीन शेख सारख्या निष्पाप मुस्लिमांची मॉबलिंचिंग केली जात आहे.

मॉबलिंचीगच्या घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मॉबलिंचीग विरोधात कायदा तयार करण्यात यावा, जिल्हा पातळीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना हॉस्टेल ची सुविधा मिळण्यासाठी हॉस्टेलची उभारणी करण्यात यावी.अश्या विविध  मागण्याचे निवेदन तहसीलदार अहमदपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना किनगांव येथील सामाजिक कार्यक्रत्यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी निवेदन देताना जाकेर कुरेशी,आसिफ तांबोळी,चांद मोमीन,शेख आसिफ आदीजन उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.