शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त जनसेवा अभियान

0

 भुसावळ प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या प्रेरणेने, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळकरांच्या सेवेसाठी जनसेवा अभियान शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १९ जून २०२१ रोजी शिवसेना शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे आणि माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक यांच्यातर्फे भुसावळ शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.

रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्कप्रमुख आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख  समाधान महाजन, भुसावळ विधानसभा संपर्कप्रमुख विश्राम साळवी, माजी आमदार दिलीप भोळे, आमदार  चिमनआबा पाटील, आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार सौ. लताताई सोनवणे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यलयीन उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे उपस्थित राहणार आहे.

१९ जून २०२१ रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर वार्ड, विठ्ठल मंदिराजवळ, भुसावळ येथे या जनसेवा अभियानात नागरिकांच्या हक्काचे विविध दाखले, कार्ड, योजना उपलब्ध आहेत. नवीन रेशनकार्ड नोंदणी, रेशनकार्डात नाव वाढवणे, नवीन मतदान कार्ड नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, नॅशनलिटी, डोमेसाईल दाखला व शासनाचे इतर दाखले व सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे.

शिवसेनेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात..

माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक आणि माजी नगराध्यक्षा माधुरी फालक यांचे सामाजिक दायित्व म्हणून शहरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खते वाटप, दिनांक १९ जून २०२१ रोजी संध्याकाळी ४ वाजता राम मंदिराजवळ, हनुमान नगर भुसावळ येथे केले जाणार आहे.

भुसावळ शहरातील नागरिकांनी आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांनी जनसेवा अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे आणि महिला आघाडी, युवासेना, रेलकामगार सेना, शिक्षकसेना, ग्राहक संरक्षण कक्ष, एसटी कामगार सेना, दिव्यांग सेना, अल्पसंख्याक आघाडी, वाहतूक सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.