दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्तचे प्रमाण पोहोचले 97 टक्क्यांवर

2

जळगाव: – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या 427 पर्यत खाली आली आहे. आज (8 डिसेंबर) रोजी 57 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 53 हजार 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.84 टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. जिल्ह्यात आज 34 नवीन रुग्णांचे निदान झाल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात आज रोजी एकूण 427 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अवघी 146 इतकी आहे यातील 34 रुग्ण आयसीयुमध्ये असून 73 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहे. तर 281 रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1306 कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद असून सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर 2.38 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 52 हजार 973 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले असून पैकी 54 हजार 872 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या अवघे 87 अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात 227 व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर 62 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये 9697 बेड, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 1310 तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 1017 व इतर असे एकूण 12854 बेड असून त्यापैकी 2019 ऑक्सिजनयुक्त तर 322 आयसीयु बेड आहेत. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 चे नोडल अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय पॉझिटिव्ह, बरे झालेले, मृत्यु व सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती

जळगाव शहरात आतापर्यंत 12642 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 12210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 279 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 153 रुग्ण उपचार घेत आहेत.

जळगाव ग्रामीणमध्ये आतापर्यंत 2576 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2488 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 82 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 6 रुग्ण उपचार घेत आहेत.

भुसावळ तालुक्यात आतापर्यंत 4260 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 4011 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 171 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 78 रुग्ण उपचार घेत आहेत.

अमळनेर तालुक्यात आतापर्यंत 4491 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 4354 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 103 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 34 रुग्ण उपचार घेत आहेत.

चोपडा तालुक्यात आतापर्यंत 4438 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 4350 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 74 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 14 रुग्ण उपचार घेत आहेत.

पाचोरा तालुक्यात आतापर्यंत 1973 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1888 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 74 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 11 रुग्ण उपचार घेत आहेत.

भडगाव तालुक्यात आतापर्यंत 1920 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1869 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 44 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 7 रुग्ण उपचार घेत आहेत.

धरणगाव तालुक्यात आतापर्यंत 2203 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2145 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 50 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 8 रुग्ण उपचार घेत आहेत.

यावल तालुक्यात आतापर्यंत 1832 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1763 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 66 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 3 रुग्ण उपचार घेत आहेत.

एरंडोल तालुक्यात आतापर्यंत 2802 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2745 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 48 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 9 रुग्ण उपचार घेत आहेत.

जामनेर तालुक्यात आतापर्यंत 4209 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 4121 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 73 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 15 रुग्ण उपचार घेत आहेत.

रावेर तालुक्यात आतापर्यंत 2260 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2143 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 101 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 16 रुग्ण उपचार घेत आहेत.

पारोळा तालुक्यात आतापर्यंत 2533 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 8 रुग्ण उपचार घेत आहेत.

चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत 3618 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 3518 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 75 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 25 रुग्ण उपचार घेत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात आतापर्यंत 1793 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1734 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 35 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 24 रुग्ण उपचार घेत आहेत.

बोदवड तालुक्यात आतापर्यंत 853 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 836 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 4 रुग्ण उपचार घेत आहेत.

इतर जिल्ह्यातील आतापर्यंत 469 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 12 रुग्ण उपचार घेत आहेत.

2 Comments
  1. bedava says

    Thanks again for the post. Much thanks again. Great. Della Marwin Fabrianna

  2. bedava says

    Im obliged for the blog post. Really thank you! Cool. Vikky Griff Lind

Leave A Reply

Your email address will not be published.