दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ३१२ नवे बाधित रुग्ण; तर ८९७ कोरोनामुक्त

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून दोन महिन्यांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज सोमवार जिल्ह्यात ३१२ नवे रुग्ण आढळून आले, तर ८९७ बरे झाले. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू (death) झाला.

 

जळगाव जिल्ह्यात या महिन्याच्या सुरवातीपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे.  जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ६२५ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख २८ हजार ९२१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्‍थितीला ७ हजार ८०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव रूग्‍णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २४९५ वर गेला आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-१३, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-१५३, अमळनेर-१०, चोपडा-९, पाचोरा-८, भडगाव-६, धरणगाव-१४, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-११, रावेर-२०, पारोळा-००, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यात ८

Leave A Reply

Your email address will not be published.