‘त्या’ कोरोना पॉझिटिव महिलेच्या संपर्कात बोदवड तालुक्यातील तीन जण

0

बोदवड – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एक ६५ वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दि.२५ रोजी प्रशासनाला प्राप्त झाला होता.सदरची कोरोना पॉझिटिव्ह महिला मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा या गावात १३ दिवस आधी मुक्कामी राहिल्याची माहिती प्रशासनाला कळताच तालुका आरोग्य यंत्रणेने मन्यारखेडा येथे धाव घेत महिलेचा ज्या ठिकाणी मुक्काम होता तेथील त्यांच्या संपर्कातील ११ जणांना पुढिल तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

तसेचं हि महिला बोदवड तालुक्यातील गोळेगाव व हिंगणा येथील आपल्या नातेवाईकांकडे १० ते ५० मिनिटे थांबली असल्याचे समोर येताचं त्यांच्या संपर्कातील गाळेगाव येथील एक महिला व एक पुरुष अशा दोन्ही जणांना पुढील तपासणीसाठी १०८ या रुग्ण वाहिकेने जळगाव येथे तपासणीसाठी हलविण्यात आले असून हिंगणा येथील एका व्यक्तीस होम क्वारंटाईन करण्यात आले. आज सकाळी त्यांनाही तपासणीसाठी जळगाव पाठवण्यात येणार असल्याची माहिती बोदवड तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी यांनी ‘लोकशाही’ शी बोलतांना दिली.
त्यामुळे तालुक्यातील ‘त्या’ महिलेच्या संपर्कात आलेल्या तिघांच्या तपासणी अहवालाकडे बोदवड तालुका वासियांचे लक्ष लागून असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.