विल्हाळे शिवारात मृत बिबट्या आढळला

0

विल्हाळे शिवारात मृत बिबट्या आढळून आला
दोघांना अटक
प्रतिनिधी वरणगाव
येथूनच जवळील वेल्हाळे शिवारामध्ये वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून बघितले असता कुजलेल्या अवस्थेतील बिबट्या आढळून आला सदर बिबट्याचे पायाचे पंजे दात काढून घेतले होते.

वेल्हाळे शिवारातील मधुकर सखाराम पाटील यांच्या शेताजवळ मृतावस्थेत वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळाली यानंतर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सी आर कां,मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी ए आर बच्छाव, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक आर जे राणे गोळेगाव वनपाल एल डी गवळी, वेल्हाळे वनपाल मुकेश बोरसे, पशुवैद्यकीय अधिकारी तडवी हे घटनास्थळी गेले असता कुजलेल्या अवस्थेत प्राणी आढळून आला.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी तडवी यांनी तपासणी करून सदरचा मृतावस्थेतील प्राणी हा बिबट्या असल्याचे सांगितले तसेच या बिबट्याचे धारदार शस्त्राने म्हणजे कापण्यात आलेले होते. तसेच कुजलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणी पीएम झाले नसून त्याचे अवयव सीलबंद करण्यात आले आहे.

धारदार शस्त्राने पाय कापल्याने घातपात असल्याची वर्तवली गेले यावेळी आजूबाजूला असलेल्या पावरे समाजातील लोकांच्या घराची झडती घेतली असता मधुकर पाटील यांचे शेत करणारे कोतवाल बदया मोरे वय 40 व त्याचा मुलगा कालु कोतवाल मोरे वय 20 यांच्या घरात बिबट्याचे दात हाड नखे मिळून आल्याने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तसेच बिबट्याचे उर्वरित अवयव सीलबंद करण्यात आले असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.