जामनेरात जुगार आड्डयावर धाड ; 12 जुगाऱ्यांवर गुन्हा

0

जामनेर( प्रतिनिधी): -देशात कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून कलम 144 लागू आहे. दर वर्षी अक्षय तृतीया च्या सणाला नियम बाह्य पणे जुगार खेळला जातो. बऱ्याच वेळेस पोलीस प्रशासन ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असते. परंतू आता लॉक डाऊन असताना जमाव बंदीचे आदेश लागू आहे. शहरातील व तालुक्यातील लोकांना कोरोनाचे गांभीर्य अजूनही लक्षात येतं नाही. त्यामुळे जामनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी शहरासह तालुक्यात अवैध धंदे जुगार, देशी ,विदेशी दारू,यांच्यावर धाडी टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे. अशाच प्रकारची धाड शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवाशी देविदास आंबादास विसपुते यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार आड्डयावर जामनेर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक धरमशिंग सुंदर्डे यांनी धाड टाकून 12 जणांवर गून्हा दाखल केला आहे.त्यात सुमारे 1,62610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यात त्यांच्या अंगझडतीत 40,460 रुपये रोख, रक्कम,33100रुपयांचे नऊ मोबाइल फोन,90000रुपये किमतीच्या 4 मोटार सायकली यांचा समावेश आहे. सबंधित 12 जणांवर कलम131/2020 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा्यक पोलीस निरीक्षक धरम सिंग सूंदर्डे करीत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.