‘तौत्के’ चक्री वादळाचा वेग वाढला ; महाराष्ट्रात अलर्ट जारी

0

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात अलर्ट जारी
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे.
या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चक्रीवादळाचे परिणाम
मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी
कोकण – मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा
रायगड – मोठा पाऊस
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस
विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

Leave A Reply

Your email address will not be published.