रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार तथा बनावट तयार करुन विकणाऱ्या फार्मासिस्टवर कारवाई करा- अनिल नावंदर

0

खामगांव (गणेश भेरडे ) रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार तथा बनावट तयार करुन विकणाया फार्मासिस्टवर कारवाई करण्याची मागणी राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी सौ. सायली मसाल, निबंधक महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद तथा अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

याबाबत विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून बातम्या प्रसिध्द झाल्या त्यावर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेने सदरहू बाबीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. राज्य संघटनेने याबाबत वेळोवेळी सभासदांना ग्राहकांची पिळवणूक न करण्याबाबत विविध प्रकारे सुचना दिलेल्या असतांनाही असे प्रकार घडणे दुर्देवीच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मागील १ वर्षापेक्षा जास्त काळापासुन आपला जीव  धोक्यात घालून समाजाला आरोग्य सेवा पुरविणाया सर्वच फार्मासिस्टना यामुळे संशयास्पद स्थितीला सामोरे जावे लागत आहे व सेवा देऊनही त्यांना गालबोट लागत आहे. तरी कायद्याच्या चाकोरीत राहूून आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाया फार्मासिस्टवरुन हे संशयाचे वादळ दूर करण्यासाठी खया गुन्हेगार प्रवृत्तीच्या काही समाज कटकांना समाजासमोर उघडे पाडून खरी सेवा देणायाचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करीत  महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने यावर कायदेशीररित्या त्वरीत कारवाई करण्याची मागणी राज्य संघटनेने सचिव अनिल नावंदर यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.