तौक्ते वादळाचा पशु पक्षांना मोठा फटका ; कावळ्याच्या पिल्लांचा वादळाने घेतला बळी

0

माथेरान प्रतिनिधी : तौक्ते वादळाचा फटका मानवी जसा मानवी जीवनाला बसला तसा पशु पक्षानाही बसला आहे ऐन पावसाच्या तोंडावर अनेक पक्षांची घरटी उद्धवस्त होत असताना आपल्या नवजात पिल्लानाही मुकावे लागल्याचे भयावह दृश्य येथे पहावयास मिळत आहे. माणसाचा आक्रोश दुःख आपण जाणतो पाहतोो. माथेरान मध्ये सर्वत्र उंच उंच झाडे जंगल असल्याने ह्या उंच झाडावर अनेक पक्षांची घरटी आहेत, काही पक्षाच्या पिल्ले, खाद्य, ह्या झाडांवर पावसाळ्यापूर्वीची तयारी साठवून ठेवले आहेत.

परंतु तौक्ते वादळाच्या तडाख्यात ह्या पक्षांना वन्य जीवाना मोठा आघात बसला आहे, आपल्या कुशीतून आपली चार पिल्ले घेऊन बसलेल्या कावळ्याच्या पिल्लांना ह्या वादळाने हिराहून नेले,उंच झाडावर कावळ्याचे घरटे असल्याने जोरदार वादळाच्या तडाख्याने कावळ्यांची चारी पिल्ले झाडावरून खाली कोसळली आणि जगाला पाहण्या अगोदरच काळाच्या आड निघून गेले अत्यन्त वृदयदायक घटना ह्या वादळात पाहवयास मिळाल्या एकीकडे आपल्या मानव जातीला काही जीवित वित्त हानी झाली की शासकीय मदत आप्ते मित्र मंडळींचे सांत्वन एक आधार असतो परंतु हे पशुपक्षी मात्र आपले अभाळाएव्हडे दुःख शान्त राहूनच पचवत असतात निसर्गाच्या कोपाने घरटे , पिल्ले, सह सहकारी सर्व काही हिरावून नेले तरी उमेद न हारता नव्या जोमाने कोणतीही अपेक्षा न बाळगता पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.