जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा ; पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून सत्कार

0

पाचोरा  (प्रतिनिधी) : पोलिस बॉईज असोसीएशन कडून आज दि. १९ मे २०२१ रोजी पाचोरा शासकीय रुग्णालयात परद्या मागील खरे हीरो पीता – पुत्र अतिश चांगरे, भैरु चांगरे सह सरीता कतार चांगरे हे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य पध्दतीने पॅकिंग करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीब्द्द्ल पाचोरा पोलिस बॉईज असोसीएशन तर्फे यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, पाचोरा पोलिस बॉईज असोसीएशन चे तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख व जळगांव जिल्हा सचिव हर्षल हिरालाल पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रफुल पाटील व बंटी पाटील, गौरव चौधरी व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवक गजानन काकडे सह पोलिस बॉईज उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.