“तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या तालुकानिहाय नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

0

रायगड (अरविंद गुरव):- “ताउत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.

या दरम्यान जिल्ह्यातील आज दुपारी 4.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.  आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 784 घरांचे अंशत: नुकसान तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.   महावितरणच्या एकूण 65 HT पोलचे, 249 LT पोलचे तर एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 100 कोविड रुग्णालये आहेत. त्यापैकी रायगड ग्रामीण क्षेत्रातील एकूण 55 कोविड रुग्णालयापैकी 26 रुग्णालये थेट वीजपुरवठयाद्वारे सुरु असून 29 कोविड रुग्णालये जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू आहेत.

त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 45 कोविड रुग्णालयापैकी 44 रुग्णालये थेट विद्युत पुरवठयावर सुरू असून एक रुग्णालय जनरेटर बॅकअप वर सुरळीत सुरू आहे

तालुकानिहाय सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :-

अलिबाग मध्ये 97 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 1 प्राण्याचा मृत्यू झाला आहे. महावितरणच्या एचटी पोल-9, एलटी पोल-70  चे नुकसान झाले आहे, 3 कोविड रुग्णालय जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू आहेत. 156 कुटुंबातील 605 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पेण मधील 107 घराचे अंशता: नुकसान झाले असून, तिचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. तसेच एका प्राण्याचाही मृत्यू झाला आहे. महावितरणच्या एचटी पोल-8, एलटी पोल-20 चे नुकसान झाले आहे. 5 कोविड रुग्णालय जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू आहेत. 62 कुटुंबातील 193 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

मुरुड तालुक्यातील 28 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, दोन कोविड हॉस्पिटल पैकी एक वीजपुरवतयावर  तर दुसरा जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू आहे. 316 कुटुंबातील 1 हजार 67 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पनवेल तालुक्यातील 43 घरांचे अंशत: नुकसान झाले असून,  महावितरणच्या एलटी पोल-2 चे नुकसान झाले आहे. 12 कोविड हॉस्पिटल पैकी 12 हॉस्पिटल वीज पुरवठाद्वारे सुरळीत सुरू आहेत. 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील 16 घराचे अंशतः नुकसान झाले असून, 1 घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. 2 व्यक्ती मृत्यू  झाल्या आहेत. महावितरणच्या एचटी पोल-21 तर एलटी पोल-23 चे नुकसान झाले आहे. 3 कोविड हॉस्पिटल  वीजपुरवठयाद्वारे सुरळीत सुरू आहेत. 122 कुटुंबातील 451 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

कर्जत  तालुक्यातील 185 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. महावितरणच्या एचटी पोल-6 तर एलटी पोल-17 चे नुकसान झाले आहे. 15 कोविड हॉस्पिटल पैकी 8 हॉस्पिटल वीजपुरवठाद्वारे तर 71 हॉस्पिटल जनरेटर बॅकअपद्वारे सुरळीत सुरू आहेत. 48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील 165 घरांचे अंशत: नुकसान झाले असून,  महावितरणच्या एलटी पोल-2 चे नुकसान झाले आहे.  9 हॉस्पिटल पैकी 2 हॉस्पिटल वीज पुरवठाद्वारे तर 7 हॉस्पिटल जनरेटर बॅकअपद्वारे सुरळीत सुरू आहेत. 670 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

माणगाव तालुक्यातील 48 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, महावितरणच्या एचटी पोल-16 तर एलटी पोल-32 चे नुकसान झाले आहे. 3 कोविड पैकी 1 हॉस्पिटल वीज पुरवठाद्वारे तर 2 हॉस्पिटल जनरेटर बॅकअपद्वारे सुरळीत सुरू आहेत.  291 कुटुंबातील 1 हजार 309 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

रोहा तालुक्यातील 55 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, महावितरणच्या एलटी पोल-4 चे नुकसान झाले आहे. 3 कोविड हॉस्पिटल जनरेटर बॅकअपद्वारे सुरळीत सुरू आहेत. 100 कुटुंबातील 523 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

सुधागड तालुक्यातील 51 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. महावितरणच्या एचटी पोल-5 तर एलटी पोल-25 चे नुकसान झाले आहे. एक कोविड हॉस्पिटल वीजपुरवठाद्वारे सुरळीत सुरू आहे. 45 कुटुंबातील 185 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

तळा तालुक्यातील 25 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 2 घराचे पूर्णता नुकसान झाले आहे.  36 कुटुंबातील 135 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

महाड तालुक्यातील 98 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, महावितरणच्या एलटी पोल-2 चे नुकसान झाले आहे. 5 कोविड हॉस्पिटल पैकी 2 हॉस्पिटल वीजपुरवठाद्वारे तर 3 हॉस्पिटल जनरेटर बॅकअपद्वारे सुरळीत सुरू आहेत. 195 कुटुंबातील 1 हजार 80 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील 118 घरांचे अंशत: नुकसान झाले असून 1 व्यक्ती जखमी झाला आहे. महावितरणच्या एलटी पोल-25 चे नुकसान झाले आहे.  81 कुटुंबातील 295 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

म्हसळा तालुक्यातील 274 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 1 कोविड हॉस्पिटल वीज पुरवठाद्वारे सुरळीत सुरू आहे. 134 कुटुंबातील 496 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील 576 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, महावितरणच्या एलटी पोल-27, ट्रांसफार्मर-1 चे नुकसान झाले आहे. 1 कोविड हॉस्पिटल जनरेटर बॅकअपद्वारे सुरळीत सुरू आहे . 761 कुटुंबातील 1 हजार 158 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.