तोंडात गहू, पीठ कोंबून पत्नीला मारण्याचा प्रयत्न

0

जळगाव, दि.3 –
भुसावळ येथील माहेर असलेली विवाहिता पती, मुलासह जळगावातील शिवाजीनगरात राहते. पती कोणतेही काम करीत नसल्याने ती स्वताच्या शिक्षणाचा सदुपयोग करीत घरीच क्लास घेऊन परिवाराचा उदरनिर्वाह करीत होती. पतीला वारंवार कामाला जाण्यासाठी बजावत असल्याने संतापलेल्या पतीने शुक्रवारी सायंकाळी तिला घरातच जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
भुसावळ येथील रिजवानाबी मेाहम्मद उमेर (वय 24) या शिक्षिकेचा विवाह तीन वर्षांपूर्वी जळगावातील मोहम्मद उमेर मोहम्मद जावेद याच्याशी झाला होता. दोघांना एक मुलगा असून तो रिजवानाबी यांच्या माहेरी म्हणजेच भुसावळ शहरात राहतो.
सासरच्या मंडळींनी दिली खोटी माहिती
लग्नाच्या वेळी उमेर याची पिठाची गिरणी असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगीतले होते. परंतू, तो काणत्याही प्रकारचे काम करीत नसल्याचे नंतर उघड झाले. असा आरोप रिजवाना यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.
स्वतः घेत होत्या क्लास
पती काहीही काम करीत नसल्याने रिजवाना यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी एका शाळेत कंत्राटी शिक्षीका म्हणून नोकरी सुरू केली. त्या पगारात भागत नसल्यामुळे त्या दररोज शाळेतून आल्यानंतर सायंकाळी घरात मुलांचे क्लास घेऊन दोन पैसे कमावत होत्या. घरात दारीद्र्य येत असल्यामुळे त्या पती उमेर यास कामाला जाण्याचे सांगत होत्या.
जेठ आल्याने बचावली
शुक्रवारी दुपारी उमेर याने रिजवानासोबत गोड बोलून मी उद्यापासून कामाला जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला घरातील एका खोलीत घेवून गेला व तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याच वेळी उमेर याला भावाच्या गाडीचा आवाज आल्याने त्याने रिजवाना यांना सोडले. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही काहीही न सांगण्यासाठी उमेर याने विनवणी केली. तासभर भाऊ घरात बसल्यानंतर निघून गेला.
तोंडात कोंबले गहू, पीठ
शुक्रवारी दुपारी घडलेल्या प्रकारानंतर सायंकाळी देखील उमेर याने राग आल्यामुळे घरी आलेल्या क्लासमधील मुलांना घरी पाठवून दिले. यानंतर घराचे सर्व दरवाजे बंद करून तसेच सर्व मोबाईल स्विच ऑफ करून देत रिजवाना यांना स्वयंपाक खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने रिजवाना यांच्या तोंडात गहु व पिठ कोंबले. यामुळे रिजवाना यांचा आवाज पुर्णपणे बंद झाला. यानंतर उमेरने रिजवानाचा गळा दाबण्यास सुरूवात केली होती. गळ्यावर दाब पडल्यामुळे रिजवाना सुन्न पडल्या.
नग्न अवस्थेत धावला पती
रिजवाना यांचा गळा दाबत असताना सुदैवाने उमेरचा पाय घसरल्यामुळे त्याचा तोल गेला, हीच संधी साधुन रिजवाना यांनी लाथ मारून त्याला बाजुला फेकले. स्वत:ची सुटका करून घेत त्या घराबाहेर पळत सुटल्या. यानंतर उमेर देखील त्यांच्या मागे पळाला होता. पळत असताना उमेरच्या अंगावर कपडे देखील नसल्याचे रिजवाना यांनी सांगीतले.
शहर पोलिसात तक्रार
रिजवाना यांनी घरून निघाल्यानंतर थेट शहर पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.