तीन चोरीच्या दुचाकींसह दोन जण पोलीसांच्या ताब्यात

0

जळगाव प्रतिनिधी । मागील गेल्या काही दिवसापासून शहरात दुचाकी चोरीच्या घटनेचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, शनीपेठ हद्दीतून चोरलेल्या तीन दुचाकींसह दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे.

याबाबात असे की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकींची चोरी बांडुक गँगचा प्रमुख शुभम शिवरात मिस्तरी (वय-२०) रा. वाल्मिक नगर हा करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अश्रु शेख, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील, वसंत लिंगायत, उमेशगिरी गोसावी यांनी कलावसंत नगर येथे रेल्वेगेट कडे जाणाऱ्या रोडवर संशयित आरोपी शुभम मिस्तरी आणि राहुल रविंद्र कोळी (वय-१९) रा. मेस्कोमाता नगर यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्या ताब्यातील दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केली आहे. तर तिसरी दुचाकी शुभमच्या राहत्या घरातून हस्तगत केली आहे. तीनही दुचाकी ह्या शनीपेठ हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.