तीन आरोपींविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल

0

भडगाव –

शहरात व परिसरात मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या बाबत भडगाव पोलिसांनी आज दुपारी 11 वाजता गुप्त माहिती च्या आधारे भडगाव बस स्टँड समोर सापळा रचून विचारपूस केली असता त्यात चोरीची मोटारसायकल मिळाली असता त्या चोरीची आढळली यावरून 3 आरोपींविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, भडगाव परिसरात व चाळीसगाव, नाशिक येथून मोटारसायकल चोरून ती खोट्या दस्तावेज तयार करून स्वस्तात विकायची असे काही दिवसांपासून चालू होते. ही माहिती एका खबऱ्याकडून भडगाव पोलिससना मिळताच त्यांनी बस स्टँड समोर सापळा रचला व त्यात विचारपूस करताना चोरीची मोटारसायकल मिळाली. या नंतर आरोपीला पोलिस स्टेशन ला आणल्यानंतर त्याने 7 मोटारसायकल चोरल्याची माहिती दिली . तसेच अजुन दोन आरोपींना अटक करण्यात आली. या चोरलेल्या मोटारसायकल मध्ये 2 हीरो होंडा स्प्लेंडर , 2 स्पेंडर प्रो, 1 सीडी 100, 1 बजाज 4s , 1 पल्यातीना , अश्या सात प्रकारच्या मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या असून तपासात अजुन मोटारसायकल जमा होतील असे यावेळी पोलिस निरीक्षक यांनी सांगितले . या बाबत मुख्य आरोपी- शफीक खा अन्वर खा वय – 25 रा भडगाव, व भूषण शिंदे वय 22 रा . भडगाव व 1 अल्पवैन आरोपीला अटक करण्यात आली असून यांच्यावर भडगाव पोलिस स्टेशन ला गु. र. न.62 /18 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरूळें यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन रावते हे करीत आहेत. या या मोटारसायकल रॅकेट चे पितळ उघडे करण्यासाठी पोलिस पोलिस उप निरीक्षक आनंद पटारे, कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, ज्ञानेश्वर महाजन, जगन्नाथ महाजन, राजेंद्र निकुंभ, स्वप्निल चव्हाण , व होमगार्ड अथक परिश्रम घेतले. व या बाबत तपासात मोठे रॅकेट उघडकीस येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.