अंत्यविधीसाठी आलेल्या भाचेजावायाचे ह्रदयविकाराने निधन

0

पाचोरा –

पाचोरा येथे दि. १ रोजी मामेसासऱ्याचे ह्रदयविकाराने निधन झाले होते. त्यांचेवर दि. २ रोजी अंत्यसंस्कार होत असल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जोगेश्वरी (मुंबई) येथील भाचेजावायाचे सकाळी सहा वाजता ह्रदयविकाराने निधन झाल्याने पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा येथील मानसिंगका काॅलनीतील रहिवासी अशोक भिकाजी ब्राम्हणे व विज वितरण कंपनीचे लाईनमन वय – ६० यांचे दि. १ रोजी सायंकाळी सहा वाजता ह्रदयविकाराने निधन झाले होते. त्यांचे अंत्यविधीसाठी आलेले श्रीराम अभिमन वाघ वय – ६२ यांचे दि. रोजी सकाळी ८ वाजता ह्रदयविकाराचे तीव्र झटक्याने निधन झाले ते मुळचे अंचळगांव येथील रहिवासी हल्ली मुक्काम जोगेश्वरी (मुंबई) येथे वास्तव्यास होते. त्यांचेवर जोगेश्वरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.