तिसर्या लाईनीसाठी मेगा ब्लॉक : सोमवारसह मंगळवारी चार पॅसेंजर रद्द

0
भुसावळ (प्रतिनिधी )- 
भादली ते जळगाव या दरम्यान असलेल्या तिस-या लाईनीसाठी स्टील गर्डर टाकण्याचे काम मंगळवार, 18 रोजी होणार असून त्यासाठी या दिवशी सकाळी 9.10 ते दुपारी 1.10 वाजेपर्यंत तासाचा मेगा ब्लॉक घेतला असून भुसावळ येथून सुटणाऱ्या  देवळाली शटल, सुरत पॅसेंजर, भुसावळ बांद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या तर एक्स्प्रेस व मेल सुपरफास्ट गाड्यांना विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबविले जाणार असल्याने या दिवशी प्रवाशांचे हाल होणार आहेत. अप-डाऊन मार्गावरील तब्बल 12 गाड्या या भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. तर खान्देश एक्स्प्रेससह सहा पॅसेजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे सोमवारी भुसावळ जंक्शनवरून सुटणार्या काही पॅसेजर रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या आहे.
रद्द केलेल्या पॅसेजर गाड्या अशा
अप भुसावळ देवळाली-शटल (51182), डाऊन सूरत-भुसावळ (59077), डाऊन सुरत-भुसावळ (59013) आणि डाऊन (19003) बांद्रा टर्मिनस-भुसावळ खान्देश एक्स्प्रेस या गाड्या सोमवारी रद्द करण्यात आल्या आहे. खान्देश एक्स्प्रेस ही गाडी बांद्रा येथून रद्द करण्यात आली तर मंगळवार, 18 रोजी डाऊन (51183) डाऊन देवळाली-भुसावळ शटल, अप (59076) भुसावळ-सुरत पॅसेंजर, अप (59014) भुसावळ-सूरत पॅसेंजर यासह अप (19004) भुसावळ -ब्रांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा मंगळवारी रद्द करण्यात आली. सहा पॅसेंजर आणि दोन खान्देश एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
मंगळवारी डाऊन मार्गावरील गाड्या अश्या थांबतील डाऊन अहमदाबाद-हावडा (12833) एक्स्प्रेस ही गाडी 10.20 ते 12.50 या वेळात पाळधी स्थानकावर थांबवणार आहेे. डाऊन (19063) उधना -दानापूर एक्स्प्रेस ही गाडी मंगळवारी दुपारी 12.10 ते 1.05 पर्यत चावलखेडा स्टेशनवर थांबविणार आहे. डाऊन (22129) लोकमान्य टिळक टर्मीनस अलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस ही गाडी शिरसोली स्थानकावर 11.35 ते 1.15 या वेळात थांबणार आहे,डाऊन (12859) मुंबई – हावडा गितांजली एक्स्प्रेस ही गाडी म्हसावद रेल्वे स्थानकावर दुपारी 12.05 ते 1.15 या वेळात थांबवणार आहे.डाऊन (12859) वास्को दी गामा हजरत निजामुद्दिन गोवा एक्स्प्रेस ही गाडी माहेजी स्थानकावर दुपारी 12.10 ते 1.15 यावेळात थांबविणार आहे. डाऊन (15017) लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्स्प्रेस ही गाडी मंगलवारी पाचोरा रेल्वे स्थानकावर 12.50 ते 1.15 या वेळात थांबविणार आहे.
अप मार्गावरील मंगळवारी या गाड्या थांबविणार
अप (15018) गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्स्प्रेस ही गाडी मंगळवारी (दि. 18) काशी एक्स्प्रेस ही गाडी भादली स्थानकावर सकाळी 10.50 ते 1.15 यावेळात थांबविणार आहे, अप भागलपूर – सूरत ताप्तीगंगा एक्स्प्रसे ही गाडी भुसावल जंकशनवर 11.55 ते 1.15 या वेळात थांबणार आहेे. गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी भुसावळ जंक्शनवर दुपारी 12 ते 1.20 अशी थांबणार आहे. अप लखनऊ मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ही गाडी दुपारी 12 ते 1.15 पर्यत दुसखेडा स्थानकावर थांबणार आहे. अप (12628) नई दिल्ली – बेंगलूर कर्नाटक एक्स्प्रेस ही गाडी सावदा स्थानकावर 12.35 ते 1.15 थांबणार आहे. अप (12860) हावडा मुंबई गितांजली एक्स्प्रेस ही गाडी वरणगाव स्थानकावर 12.55 ते 1.15 पर्यत थांबणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.