तालुकास्तरावर स्थानिकांसाठी ५०% ऑनलाईन व ५०% ऑफलाईन नोंदणी व्हावी

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी : तालुकास्तरावर स्थानिकांसाठी ५०% ऑनलाईन व ५०% ऑफलाईन नोंदणी व्हावी जेणे करून लसीकरण नोंदणीचा गोंधळ कमी होऊन, लसीकरण सुविधा सुरळीत चालेल याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा जळगांव जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन मागणी केली.

जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर सकाळ पासून रांगा लागून स्थानिकांना लसीकरणा पासून वंचित रहावे लागत आहे. व दुसऱ्या तालुक्यावरील व्यक्ती दूरवरून येऊन लसीकरण सुविधेचा लाभ घेत आहे.

स्थानिकांना तालुक्यातच लस सुविधा मिळण्यासाठी तालुकास्तरावर उपलब्ध लस साठ्यापैकी ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन अशी लस नोंदणी व्हावी जेणेकरून स्थानिकांची आपल्याच तालुक्यात लस नोंदणी करतांना अडचण येणार नाही व नागरीकांमध्ये गोंधळ कमी होऊन जिल्ह्यातील लसीकरण सुविधा सुरळीत चालेल याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. यावेळी भाजपा जळगांव जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील हे सोबत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.