अमरावती शहरात पोलिसांची तीव्रतेने मोहीम ; वर्दळ थांबली

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी रविवारपासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर. सोमवारी व आज मंगळवारी ही पोलिसांनी तीव्रतेने मोहीम राबविली. नाहक फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासोबतच त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

अमरावती शहरातील चौकाचौकात व मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी मोहीम राबविली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना नागरिक लॉकडाउन  चा फज्जा उडविते होते. त्यातूनच अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या बाराशे पार झाली. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी. रविवार 9 मे पासून तर 15 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आहेत. रविवारी व सोमवारी पोलिसांनी शहरात जोरदार कारवाई केल्यानंतर आज मंगळवारी देखील हा धडाका सुरु होता.

आज सकाळपासूनच पोलिसांनी शहरात फिरणार्‍यांवर कारवाई केली. अनेक जण नाहक फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी देखील अनेकांवर कारवाई केली.

शहरातील वेलकम पॉइंट ,कठोरा रोड ,छत्री तलाव ,वडाळी परिसरात नागरिकांचा आज सकाळी मॉर्निंग वॉक सुरू असल्याचे चित्र होते. अनेकांनी सवयीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक आठच्या आत आटोपून घर गाठले.

नागरिकांनी गरज नसताना रस्त्यावर फिरू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी शहर कोतवाली, गाडगेनगर, राजापेठ ,फ्रेजरपुरा आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली . पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्यांची वाहने देखील जप्त करण्यात आली .या दरम्यान राजकमल चौक येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता .याच ठिकाणी रॅपिड टेस्ट करण्यासाठी वैद्यकीय चमू तयार होती .गरज नसताना फिरणाऱ्या दुचाकी चालकांची यावेळी कोविड टेस्ट करण्यात आली . पोलिसांच्या या कारवाईमुळे आज शहरातील रस्त्यावरील वर्दळ थांबवून शुकशुकाट निर्माण झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.